Sunday, 1 May 2011

'Marathi translation of pearls' from the 'Ram Katha - Manas Patanjali by Morari Bapu in the auspicious presence of Swami Ramdev at Patanjali Yogpeeth.' as understood by me.

इथे मला आस्था टी. वी. वर ऐकलेले काही अमृत विचार लिहायायचे आहेत. हे विचार मी परम पूज्य श्री मोरारी बापू ह्यांच्या प्रवचना मध्ये ऐकले आहेत. मोरारी बापू हे उत्तुंग उंची असलेले महा पुरुष आहेत तर मी एक सामान्य माणूस आहे. जर वाचकांना असे वाटले की मी इथे सांगितलेली गोष्ट बरोबर नाही तर त्यांनी त्यांचे विचार इथे लिहावे, त्यांचे स्वागत आहे.

साधू च्या आश्रमाला दारेच दारे असतात आश्रमाला भिंती नसतात.

माझा भारत हा स्मित हास्य करणारा भारत आहे.

जनहो तुम्ही ऐका प्रशांत आणि प्रसन्न होऊन ऐका, एकाग्रता नसली तरी चिंता नाही.

आकाशाकडे फक्त इंद्र धनुष्याची कामना करू नका तिथे वीज पण आहे आणि सोसाट्याचे वारे पण आहेत.

काही लोक सत्याचा उच्चार तर करतात पण दुसऱ्याने सांगितलेले सत्य ते स्वीकारत नाही.

गांधीजींचे आदर्श इतके उत्तुंग आहेत की कोणी असे म्हणणारा की मी गांधीवादी आहे दंभच करत असतो.

ज्या वाटेवर आम्ही निघालो होतो तिकडे रस्ताच नव्हता.

शीशा पत्थर साथ रहे बात नही  घबराने की
 लेकीन शर्त इतनी है की बात न हो टकराने की

गानिमत है की मौसम पर उनकी हुक़ुमत नही चलती
वरना सारे बादल उनके खेत में ही बरस जाये

गोस्वमीजीनी यम नियमांना फुल म्हटलेले आहे.

फुल म्हणजे रस, गंध, पराग, आकार.

यम नियमाचे पालन करतांना माणसाने फुला प्रमाणे बहरावे.

सत्याच्या तीन रेखा आहेत, विचार, उच्चार, आचार.

आपण दुसर्याने सांगितलेले सत्य स्वीकार पण करावे.

सत्य हे जय आणि पराजयाच्या वर आहे.

यह अकेला (साधू) नही थकेगा मिलकर बोझ उठाना.

सिद्ध होऊ शकत नही तर शुद्ध व्हा.

विचारांना पण संतुष्टीची मर्यादा असावी.

लक्षात ठेवा की शास्त्र सुद्धा वासनेचे रूप धारण करू शकते.

पण ह्याचा अर्थ असा नही की स्वाध्यायात प्रमाद करावा.

हम बाट ले काईनाथ तू मेरा बाकी तेरा म्हणजेच ईश्वर  प्रणीधान

यम नियम हे फुल आहेत, शूल आहेत, मूळ आहेत.

निज  गीरा पावन करन  कारण, राम जस तुलसी कह्यो.
फुलांमध्ये दहाही यम नियम आहेत.

बघा योगी हे अत्यंत सुकुमार असतात, ते मुळीच हिंसक नसतात.

गुरु  म्हणजे आपला विवेक किंवा ग्रंथ सुद्धा गुरु असू शकतो.

मन क्रम बचन छाडी  चतुराई, तब कृपा करीहही राघुराई

नसीम वो रुठते है तो रूठने दे, क्या बात बन जायेगी मनाने से

जर कोणी तुमच्यावर रागावले असेल तर प्रेमाने त्याच्याकडे दुर्लक्ष करा.

गुरु वर श्रद्धा ठेवा, गुरु वर प्रेम करा.
देखकर दिलकशी जमाने की , आरजू है फिर धोका खाने की
ए गमे  जिंदगी तू नाराज ना हो, हमे आदत है मुस्कुराने की

अंधेरे से मत डरो रस्ते मे, कोई रोशनी मिल जायेंगी शराबखाने की

गुरु म्हणजे महापुरुषांचा संग

ईर्ष्या करणे हा ज्याचा स्वभाव आहे तो कोणाची पण ईर्ष्या करेल, बापाची, मुलाची, गुरूची.

चरागो का कोई अपना मकान नही होता
 व्यास म्हणजे खूप विशाल.

समीपता, संपर्क, सन्निधी, संसर्ग  एक साररखे आहेत पण एक नाही.

आँख तो उसकी अलीन होती है, और लोग मुझे सवाल करते है.

साधू च्या कोणी जवळ असत नाही, साधू कोणापासून दूर असत नाही

मैल भरा है मन मे, मुखडा क्या देखु दर्पण मे

मै जिसे  ओढता बिछाता हूँ, वही गजल आपको सुनता हूँ .

प्रज्ञा नसेल तर शास्त्र काय कामाचे, डोळे नसतील तर आरसा काय कामाचा.

न कोई गुरु न कोई चेला, अकेले मे भीड, भीड मे अकेला.

तपाचे  चे फळ - सिद्धी

संत विश्वाला प्रकाशित करतात, प्रभावित नाही.

खुदा ए बंदगी असीम होती है, इसलिये जिंदगी हसीन होती है.

अभी तो जाम खाली है, ए गर्दीशे ऐय्याम मै कुछ सोच रहा हूँ.
साकी तुझे थोडी तकलीफ तो होगी, मेरा सागर थाम ले मै कुछ सोच रहा हूँ.
पहले तो बहुत लगाव था तेरे नाम से मुझको, अब तेरा नाम सुनके मै कुछ सोच रहा हूँ.

न अगली देख न पिछली देख मै सदके जावा मझली देख.

जे झाले त्याची चिंता करू नका, जे होणार आहे त्याची ही नको, जे आत्ता आहे ते पहा.

पूजो सबको सेवो एक को, सभीमे उसका नूर समाया.

बडे नादान थे ये चंद आंसू भी, बडी सादगी  से बह गये.

सोये कहा थे आंसू से तकिये भिगोये थे.

कृष्णानी धन सोडले, रण सोडले, पण सोडला, करुणा सोडली नाही.

वाणी - मन - संकल्प - चित्त - ध्यान - योग विज्ञान - बळ - अन्न - जल - तेज - आकाश - स्मरण - आशा - प्राण

कसलीही  आशा नसणे  म्हणजे आसन.

कोणा  सोबत राहण्या पेक्षा कोणावर विश्वास ठेवणे मोठे.
काही नवीन मिळविण्या पेक्षा, जे आहे ते राखून ठेवणे चांगले.
नियम पाळण्यापेक्षा प्रेम करणे चांगले.

किसीसे उनकी मंजिल का पता पाया नही जाता, वो जहा है फारीश्तो को वहा जाया नही जाता
प्रेम मार्ग के पथिक आशा तक नही रखते.

रामायणातील बालकांड हे यम नियमाचे कांड आहे.

अयोध्या कांड हे आसनाचे कांड आहे.

जे रोगासन ही नाहीं आणि भोगासन ही नाही ते योगासन.

आसन सत्वगुणी असावे, तिथे रजोगुण किवा तमोगुण नको. 

सहज अवस्था ही सगळ्यात उत्तम अवस्था आहे.

बुध विश्राम सकल जन रंजन.

नदी के घाट पर गर सियासी लोग बस जाये, तो प्यासे लोग एक बुंद पानी को भी तरस जाये.

मै उम्र भर अदम न दे सका जवाब, वे मुस्कुराकर इतने सवाल कर गये.

फुरसत का वक़्त देखकर मिलना कभी अजल, अभी मुझको भी काम है तुझको भी काम है.

आसन ते जिथे प्रयत्न हळू हळू शिथिल होऊन जातात.
जिथे द्वंद्वाचा आघात होत नाही ते आसन.
इथे आपण बदलत नाही तर भूमिका बदलते.

कृष्णमुर्ती  म्हणतात की तुम्ही प्रयत्नपूर्वक झोपू शकत नाही.
ओशो म्हणतात की काय आपल्या साधल्याने आसन सिद्धी होणार आहे?

प्रयत्न सोडू नका पण त्याने काही होणार नाही.

बडा दुश्वार था दुनीया में ये फन आना भी, की तुम्हीसे फसला रखना और तुम्हे अपनाना भी.

प्राणायाम म्हणजे प्राणाचा विस्तार.

सिद्धते चा अहंकार येऊ शकतो, शुद्धतेचा ढेकर येतो.

कबीर म्हणतो की अहो जन हो काही तरी सृजनशील  करा हो 
कह कबीर कछू उद्दयम कीजे 

प्राणायाम केल्याने खाली दिलेले लाभ होतात...
१. लघुत्वम - शरीरामध्ये तरलता येते.
२. आरोग्य 
३. अलोलुपत्वम
४. वर्ण प्रसादम
५. स्वर शौष्ठवम

गमे हयात को खुशगवार कर लुंगा, मै तेरी जफावो  से प्यार कर लुंगा.

शाहो की निगाहो में अजब तासीर होती हैं
निगाहे लुफ्त से देखे तो खाक भी अक्सीर होती हैं.

जब तुम मुझे अपना कहते हो, अपने पे गुरुर आ जाता हैं 

शास्त्र प्रत्येक काळा मध्ये प्रासंगिक असते.

शरीरामध्ये असलेले वायु..
१. प्राण - नासिके पासून हृदया पर्यंत
२. अपान - मल मुत्र विसर्जन करणारा वायु  
३. समान - पचन क्रिया करणारा
४. व्यान - अंगा अंगा पर्यंत रक्त संचालन करणारा.
५. उदान - कंठा पासून मस्तिष्का पर्यंत जाणारा 

प्राणायाम म्हणजे संपूर्ण विश्वा मध्ये सीताराम पाहणे. 
सियराममय सब जग जानी. 

ज्यांना काही प्राप्त करून  घ्यायचे आहे त्यांनी जय जय सुर नायक म्हणावे.
संसारी लोकंनी विरक्ती निर्माण करण्याकरता रुद्राष्टक म्हणावे.
वान्प्रस्थ्यांनी अत्री मुनीच्या रचनेचा पाठ करावा.

अरण्य कांडा मध्ये राम वनवासी आणि गीरीवासी पर्यंत पोहोचले म्हणून अरण्य कांड हे प्राणायामाचे कांड आहे.

जेव्हा पंख जातात तेव्हा दृष्टी राहाते, म्हणजे कर्म नाही पण ज्ञान आहे.

हिलने लगे ही तख्त, उछ्लने लगे है ताज
शाहो ने जब सुना कोई किस्सा फकीर का

सगळ्यांचे भरण पोषण करा, शत्रुता मिटवा.

तोड दी है मैने बेडिया सब, अब न तू है न रब
तू बेवफा हुआ तो हुआ, अब न होना बेअदब.

हमसफर भी है सहारे भी है, फिर क्यो बह रहे आंसू बेसबब.

रामाच्या लग्ना मध्ये कामदेव हा रामाचा घोडा झाला होता,
विवाह व्यवस्था कामाला बेलगाम करण्या करता नाही.

किष्किंधा कांडा मध्ये  प्रत्याहार समजावलेला आहे.
सुग्रीव बालीच्या भयाने द्रोणगिरी पर्वता वर निवास करतो, इथे इंद्रियांना बहिर्मुख न करण्याकडे संकेत आहे.
बाली जेव्हा प्रभूंना पाहतो तेव्हा आपला अहंकार सोडून  देतो.

सुंदर कांडा मध्ये धारणा समाजावलेली  आहे.
सीता अनेक राक्षसींच्या उपस्थितीत आपली दृष्टी पायावर आणी मन रामावर केंद्रित करते.

लंका कांड हे ध्यानाचे कांड आहे.
रावण आपले अस्तित्व प्रभु रामचंद्रांच्या हृदयात लीन करतो.

उत्तर कांड हे समाधी चे कांड आहे.
समाधी म्हणजे आपल्या हृदयाच्या सिंहासनावर प्रभु रामचंद्रांचा राज्याभिषेक.

धारणा म्हणजे लीन होणे.
ध्यान म्हणजे लयलीन होणे.  
समाधी म्हणजे तल्लीन होणे.

No comments:

Post a Comment